बेलापूर – श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव परिसरातील रहिवाशी पोपट चांगदेव काळे, वय ७० वर्ष यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.
पोपट काळे या वृद्धाला विजेचा शॉक लागल्यानंतर श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले होते.
तेथील डॉक्टरांनी तपासले असता काळे हे वृद्ध मयत झालेले होते. डॉक्टरांच्या खबरीवरुन शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोना राशिनकर हे पुढील तपास करीत आहेत.