अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मुंबई ते भाळवणी प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील अकरा व्यक्तींवर पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
भाळवणीचे ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करुन
सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, द्रौपदी मारुती भोसले, बाबासाहेब मारुती भोसले, सुनीता बाबासाहेब भोसले,
साळूबाई सुरेश भोसले, संदीप सुरेश भोसले, नंदिनी सुरेश भोसले, सुहास सुरेश भोसले, पूजा सुहास भोसले (सर्व भाळवणी) हे विनापरवाना मुंबईहून आले.
प्रशासनास कोणतीही कल्पना न देता भाळवणी येथील विलगीकरण कक्षात ते दाखल झाले. हा प्रकार १३ ते १५ जूनदरम्यान घडला.
भाळवणी येथे कोरोना संसर्ग झालेला दुसरा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले असून भोसले कुटुंबीय भाळवणीत दाखल झाल्यानंतर पाच दिवसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews