अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- शहरातील पथदिव्यांचा प्रश्न प्रलंबित अाहे. शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्री अंधाराचे साम्राज्य असते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पथदिवे तातडीने दुरूस्त करावेत, विद्युत विभागाचे जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी गुरूवारी बैठकीत बोलताना दिला.
महापाैर वाकळे यांनी पथदिव्यांचा आढावा घेतला. यावेळी समवेत स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, इलेक्ट्रिक विभागप्रमुख राजेंद्र मेहेंद्र, रवींद्र बारस्कर, अजय चितळे, विलास ताठे,
स्टोअर विभागप्रमुख अशोक जाधव आदी उपस्थित होते. पुढील आठवड्यापासून शहरात सर्वत्र पथदिवे बसवण्याच्या कामाला सुरूवात होईल. नगरसेवकांच्या निधीतून मागवण्यात आलेले साहित्यही लवकरच उपलब्ध होणार आहे.
पुढील कालावधीत शहरात बीओटी तत्त्वावर एलएडी व रिपेअरिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी एजन्सीही नेमली जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
दिवाळीपूर्वी शहरातील बंद पथदिवे तातडीने दुरूस्त करावेत, अन्यथा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे महापौर वाकळे यांनी सांगितले.
वायरमनच्या कामांच्या दैनंदिन नोंदी ठेवा, प्रत्येक कर्मचाऱ्याकडे गणवेश व ओळखपत्र असायला हवे, नगरसेवक व नागरिकांचे दूरध्वनी घेऊन प्रश्नाला उत्तर द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved