महाराष्ट्र

महावितरणला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश, काय आहे आदेश वाचा सविस्तर…….

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कृषी पंपाच्या थकबाकीसोबतच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकर वीज जोडणी कशी मिळेल यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न केले पाहिजेत.

यासाठी जिल्हा पातळीवर कृती आराखडा करून त्याची धडक अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले असून, जे कंत्राटदार कामे करण्यास हयगय करीत असतील अश्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले.

महावितरणकडून विविध कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे असेही ते म्हणाले आहे. या संदर्भात पुढे नितीन राऊत म्हणाले की, कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शेतकरी मेळावे घ्या

तसेच ग्राम पंचायत पातळीवर बैठकी घेऊन “कृषी धोरण-2020″ची माहिती शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

यासोबतच वीज जोडण्यासाठी पैसे भरूनही आजवर कृषी पंप जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहेत.

रिसोड- मालेगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या पुढाकाराने वाशीम जिल्ह्यातील वीज विषयक समस्यांचा आढावा ऊर्जामंत्री राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला आहे.

रिसोड आणि मालेगाव तालुक्यात वीज ग्राहकांना होत असलेल्या समस्येची माहिती महावितरणला असून या परिसरातील वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा मिळावा

यासाठी दोन्ही तालुक्यात 5 एमव्हिए क्षमतेचे दोन वीज उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच शिरपूर,जवळा येथे अतिरिक्त 5 एमव्हिए क्षमतेचे रोहित्र लावण्यात येणार आहे.

वाशीम जिल्ह्यात सध्या उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत 431 शेती पंपाच्या वीज पंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित आहे.फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिल्लक वीज जोडण्यापूर्ण करण्याचे उद्धिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office