Electric Bike : जबरदस्त लूकसह इंजिनही आहे दमदार, एकावेळी 6 लोक बसून धावेल 150 किमी; बघा “ही” जुगाड इलेक्ट्रिक बाईक…

Electric Bike : जभरात असे अनेक लोक मिळतील ज्यांनी स्वतः जुगाड लावून अनेक चांगली वाहने बनवली आहेत, आणि अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अश्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियावर पहिल्या आहेत, यावेळी असंच काहीस पाहायला मिळत आहे, सोशल मीडियावर एक इलेक्ट्रिक जुगाड वाहन व्हायरल होत आहे, चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारे महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी आपल्या अकाऊंटवरून असा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप सुंदर आहे. हा व्हिडिओ इलेक्ट्रिक बाईकचा आहे ज्यावर 6 लोक बसू शकतात.

Electric bike (10)

भारतातील एका होतकरू मुलाने जुगाडमधून इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे, ज्यामध्ये 6 सीट आहेत. या मुलाचे म्हणणे आहे की, ही 6 सीटर इलेक्ट्रिक बाइक एका चार्जमध्ये 150 किलोमीटरची रेंज देते. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून महिंद्राचे मुख्य डिझायनर अधिकारी प्रताप बोस यांनाही टॅग केले आहे.

Advertisement

ही इलेक्ट्रिक बाईक लोखंडी पाईपच्या मदतीने बनवण्यात आली आहे. हा पाइप सुमारे 8 ते 10 फूट लांब आहे. या पाईपचा वापर करून मुलाने बाईकची फ्रेम तयार केली आहे. फ्रेमच्या खाली एक फूटरेस्ट ठेवलेला आहे. प्रत्येक प्रवासी सीटसाठी एक हँडलही बसवण्यात आले आहे.

समोर आणि मागील दोन्ही बाजूंना टेलिस्कोपिक फॉर्क्स बसवण्यात आले आहेत, जे याला चांगले सस्पेंशन देतात. त्यामुळे खडबडीत रस्त्यावरही ही बाईक चांगली धावू शकते. या बाईकची बॅटरी बाईकच्या शेवटी बसवण्यात आली आहे. चार्जिंग युनिटही तिथे बसवले आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक बाइकची किंमत

ही 6 पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक बाइक बनवण्यासाठी 10 ते 12,000 रुपये खर्च आला आहे. त्याच्या चार्जिंगच्या किंमतीबद्दल बोललो तर ती एकदा पूर्ण चार्ज करण्याचा खर्च 8 ते ₹ 10 पर्यंत येतो. म्हणजेच, तुम्ही फक्त ₹ 10 मध्ये 6 लोकांसह 150 किलोमीटरचा प्रवास करू शकता.

Advertisement