Thane News : मुंब्रा बायपास मार्गे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane News : ठाणे शहरात वाहतुकीत बदल केल्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा फटका बसणार आहे. ठाणे वाहतूक शाखेने साकेत पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल केल्याची अधिसूचना जारी केली आहे.

खारेगाव टोलनाका ते वडपे रस्ता दुरुस्तीसाठी या आधी वाहतुकीत बदल केले होते. त्यानंतर आता साकेत पुलावरून जड-अवजड वाहनांची वाहतूकही धोकादायक असल्याने हे बदल करण्यात आले आहेत.

खारेगाव टोलनाका ते पडघा यादरम्यान खड्डे बुजवणायचे काम सुरू असल्याने ३० ऑगस्ट पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असतानाच २३ ऑगस्ट २०२३ रोजी वडपे-ठाणे मुंबई नाशिक वाहिनीवरील साकेत फुलाच्या निखळलेल्या बेअरिंग कुशनमुळे पुलास हादरे बसत आहेत.

या दुरुस्ती कामासाठी वाहतुकीत बदल करण्याची अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी जारी केली आहे. जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व जड- अवजड वाहनांना माजिवडा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर माजिवडा येथून वाहने आनंदनगर चेकनाका, एरोली, रबाळे, तुर्भे मार्गे जेएनपीटीकडे दिवसा १२ ते ४ दरम्यान वाहतूक करू शकतात.