अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला दिसून येत आहे. यामुळे आता परिस्थिती पुर्वव्रत होत आहे.
दरम्यान राज्यातही कोरोना रिकव्हरी रेट सुधारला असल्याने शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्य सरकारने 5 वी ते 8 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानूसार जिल्ह्यात 2 हजार 3 शाळांपैकी 1 हजार 766 शाळा सुरू झालेल्या आहेत. त्या ठिकाणी 6 हजार 614 शिक्षक कार्यरत असून पैकी साडेपाच हजार शिक्षकांंची करोनाची चाचणी झालेली असून त्यात 19 शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात 9 वी ते 12 वीपर्यंत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय 23 नोंव्हेबरला सुरू झाले आहेत. मात्र, या ठिकाणी अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही 2 लाख 84 हजार असतांना या ठिकाणी अवघी 99 हजार 246 विद्यार्थ्यी प्रत्यक्षात शाळेत येत आहेत.
तर 1 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी संमती पत्र भरून दिलेले आहेत. या शाळामधील 173 शिक्षकांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या 2 हजार 873 शाळा सुरू झाल्या असून त्या ठिकाणी अवघे 2 लाख 16 हजार विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत.