स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतही नागरिकांना चिखलातून काढावा लागतोय मार्ग !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- देशाला स्वातंत्र मिळून तब्बल 70 वर्षे पूर्ण झाली.या 70 वर्षात देशात अनेक क्रांतिकारक बदल झाले आहेत. अपवाद वगळता शेवगाव तालुक्यातील मंगरूळ बु ते चापडगाव हा रस्ता.

या रस्त्याची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही या रस्त्याचे काम न झाल्याने मंगरुळकरांसह परिसरातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.

पावसाळ्यात तर हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद होतो .या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे . मंगरूळ बु ते चापडगाव हा खूप वर्षापासून चा जुना रस्ता असून

शेवगाव-पाथर्डी सह औरंगाबाद जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून आषाढीवारीला पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या दिंड्या तसेच

शेवगाव-पाथर्डी  तालुक्यातील त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील जलाभिषेक करण्यासाठी गोदावरीचे पायी कावडीने पवित्र जल घेऊन जाणारे भक्तगण ,

नाथषष्ठीस हजारो वारकरी पायी मोठ्या संख्येने  जात असतात परंतु रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे अनेक पायी दिंडीचालकांनी  आपल्या मार्गात बदल केल्याने या रस्त्याने होणारा नामघोष बंद होत चालला आहे.

तसेच चापडगाव हे परिसरातील लोकसंख्येने मोठे असलेले गाव असल्याने दैनंदिन गरजांसाठी या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.

त्यासाठी हा रस्ता  महत्त्वाचा समजला जातो .सध्या तर हा रस्ता  अडचणीचा ठरत आहे .पाऊस आला की हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंदच असतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24