महाराष्ट्र

माझ्या ९० वर्षांच्या आईवरही आरोप केले तरी आम्ही सर्वांना पुरून उरू.. आम्ही झुकणार नाही; किरीट सोमय्या

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somiya) यांना आज आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा दिला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना आम्ही सर्वांना पुरून उरू.. आम्ही झुकणार नाही.. असे म्हणत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर आरोप करताना या दोघांनाही जेलमध्ये टाका. पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवा, अशी भाषा वापरल्याची आठवण किरीट सोमय्या यांनी करून दिली. हा मुद्दा घेऊन सोमय्या यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, ‘संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचं माफिया सरकार अशीच भाषा वापरू शकते. पण न्यायालयाने खरी बाजू उचलून धरली. नील सोमय्या यांनाही कोर्टानं प्रोटेक्शन दिलं आहे. त्यांच्याविरोधात फर्जी एफआयआर दाखल केल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे,’ असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तसेच किरीट सोमय्या यांची पत्नी मेघा सोमय्या यांच्याविरोधातही संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी माझ्यासकट नील सोमय्या, मेघा सोमय्या इतकच काय तर माझ्या ९० वर्षांच्या आईवरही आरोप केले तरी आम्ही सर्वांना पुरून उरू. आम्ही झुकणार नाहीत.. असा थेट इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

दरम्यान, नील सोमय्या यांना कोर्टाने दिलासा दिला असून या प्रकरणी तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मात्र अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office