अहोरात्र काम करून देखील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना संकटाचा परिणाम जगभर झालेला दिसून येत आहे. यामुळे अर्थव्यवस्था देखील डबघाईला आली आहे. मात्र आता हळूहळू सर्वसेवा पूर्वरत आहे.

या महाकाय संकटातून जग सावरताना दिसत आहे. एकीकडे काही जण दिवाळीचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे मात्र अहोरात्र सेवा करणाऱ्या काही जणांची दिवाळी अक्षरश अंधारात गेली आहे.

आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करीत असलेलं श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस गावच्या कामात स्वताला झोकून दिले,

तसेच गावाला खऱ्या अर्थाने घर पट्टी, पाणी पट्टी आणि इतर कर गोळा करून दिला, ग्रामपंचायतीस आर्थिक हात भार लावणारे ,

कोरोना सारख्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण गाव, वाड्या वस्त्यांवर जाऊन औषध फवारणी सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली.

सर्वांच्या हाकेला साथ देत आपलं कर्तव्य पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज पदाधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली.

ही बाब अतिशय खेदजनक आणि संताप आणणारी आहे. त्या कर्मचाऱ्यांना ना दिवाळीचा बोनस, ना त्यांना पगार अशी वाईट अवस्था कर्मचाऱ्यांची झालीय.

कायम त्यांच्यावर अधिकार गाजवणारे पदाधिकारी स्वतः दिवाळी गोड करून आनंदात व रुबाबात फिरतात व आदर्श गावचे स्वप्न पाहतात.

कर्मचाऱ्यांच्या अभावी गावे सर्वगुण संपन्न होणार नाही, कोणत्याही संकटात मात्र कर्मचाऱ्यांकडून काम करून घेऊन देखील त्यांची दिवाळी बेरंग झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24