झारीतील शुक्राचार्यांची चौकशी झालीच पाहिजे – वैभव पिचड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला जात आहे.

भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.

आमची जी काही नाराजी आहे ती आजच्या बैठकीत सांगितली जाईल, विखेंमुळे आणि त्यांच्या चुकांमुळे पक्षाचा पराभव झाला, असा आरोप माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केला आहे.

तर पक्षाच्या झारीतील शुक्राचार्यांची चौकशी झालीच पाहिजे, वरिष्ठ त्यावर नक्की निर्णय घेतील, असा विश्वास भाजप नेते वैभव पिचड यांनी व्यक्त केला.

यानिमित्त विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर आले होते.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नगर जिल्ह्यातील  सर्व नाराज आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24