मुंबई विद्यापीठासह राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये परीक्षा पार पडल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- यंदाच्या वर्षी काही विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे, परतीच्या पावसामुळे, पुरामुळे, कंटेंटमेंट झोनमुळे, परिक्षेला मुकावे लागले आहे. तसेच परिवारातील व्यक्ती किंव्हा स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यामुळे परीक्षा देता आली नाही.

या विद्यार्थ्यांची दिवाळीनंतर पुढच्या पंधरा दिवसांत परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जे विद्यार्थी नापास होतील, त्यांची फेरपरीक्षा, जी पाच ते सहा महिन्यांनी घेतली जाते; ती देखील एक महिन्याच्या आत घेतली जाईल,

असेही ते म्हणाले. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विविध विद्यापीठांत झालेल्या परीक्षांच्या निकालांबद्दल माहिती दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24