अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोरोणासंसर्ग विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. आता हे सर्व उद्योग धंदे सुरू झाले असून एक्साईट कंपनीमध्ये कामगाराकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून घेतले आहे.
यासाठी कामगारानीही रात्रंदिवस काम करून १२ लाख ५० हजार बॅट्यांचे उत्पादन काढून दिले आहे. यासाठी दि. २३ ऑक्टोबर रोजी कंपनी प्रशासनाकडे स्वराज्य कामगार संघटनेने बोनससह सानुग्रह अनुदान देण्यात यावे
अशी मागणी करण्यात आली. सानुग्रह अनुदान काही वर्षापासून बंद करण्यात आले आहे. तरी तेही कामगारांना मिळावे. व कंपनीकडून बक्षिस प्रोत्साहन पर दिवाळी गिफ्ट म्हणून आर्थिक स्वरूपात मदत करून कामगारांची दिवाळी गोड करावी.
यासाठी वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर एक्साईट कंपनीने कामगारांची दिवाळी गोड केले आहे. दरवर्षी कामगाराना वीस टक्के बोनस देत होती. पंरतु या वर्षी कंपनीने कामगारांच्या खात्यात दिवाळी बक्षिस ७,४१४ रू जास्त जमा केले आहे.
यावर्षी कामगारांना एकूण २४,४१४ रू. बोनस व बक्षिस मिळाले आहे. यासाठी स्वराज्य कामगार संघटनेने कंपनीच्या प्रशासनाचे आभार मानून पेठे वाटप केले.
अशी माहिती स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी सांगितली. यावेळी कंपनीचे सी.ओ.एम. अरविंद कुलकर्णी एच.आर. हेड संतोष डबीर यांचे पेठे देऊन आभार मानले.
सचिव आकाश दंडवते, रवि वाकळे, महेश गलांडे, कामगार प्रतिनिधी सुनिल देवफुळे, दिपक परभणे, स्वप्नील खराडे, सचिन कांडेकर, रमेश शिंदे, सागर ठाणगे,
अप्पा पानसंबळ, भास्कर गवाणे, विभिशन पाडूळे, वशिम शेख, सागर बोरूडे, राम घुगे, आजीनाथ शिरसाठ, सोमनात बरबोले, हर्षद विरंगळ, संतोष शेवाळे, विजू काळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved