अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- मागील निवडणूक हि अनेक बड्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आली होती. अनेक दिग्ग्ज नेत्यांनी वर्षानुवर्षे कामे केलेल्या पक्षांना रामराम ठोकत विरोधी पक्षात प्रवेश केला होता.
यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. यातच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू हे नगर दौऱ्यावर आले होते. यातच त्यांनी एक वक्तव्य केले ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
नुकतीच बच्चू कडू हे नगर दौऱ्यावर येऊन गेले.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चारचा केली. ते म्हणाले होते कि, केंद्र सरकारने शेतमालाचा 50 टक्के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा.
हमीभावानुसार सरकारनेच शेतमाल खरेदी करावा. असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी विधेयकांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन,” असा उपरोधिक टोला लगावतानाच,
बिहार निवडणुकीचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नसल्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. जलसंपदा कार्यालयात दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री कडू यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले कि, राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. बिहार निवडणुकीत त्याचा अनुभव आल्याचे मंत्री कडू यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved