अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गुन्हेगारीचे शहर म्हूणन ओळख असलेल्या उत्तरप्रदेश मध्ये मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे.
या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात हजारे म्हणाले कि, हाथरस घटनेतील संशयित आरोपींना फाशीचीच शिक्षा होणे गरजेचे आहे. ही घटना म्हणजे मानवतेला व भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी आहे.
देशातील ही घटना म्हणजेच चिंताजनक बाब असून या भागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणारेच कमी पडत असल्याची खंत ही हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.
हजारे यांनी संताप व्यक्त करत अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली तरच पुढील काळात अशा घटणांना आळा बसेल असेही हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved