अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा आणखी एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ड्रॅगन फ्लाय या थ्री स्टार हॉटेलवर धाड टाकून तीन मुलींची सुटका केली आहे. यामध्ये एक हिंदी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि एक अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांना याबाबत वेस्टीन हॉटेलमधून टीप मिळाली होती की, प्रिया शर्मा नावाची एक महिला एजंट मुंबईतील उच्चभ्रू हॉटेलमध्ये मुली पुरवण्याचे काम करत आहे.
त्यानुसार रात्री उशीरा पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. अटक करण्यात आलेल्या प्रिया शर्मा ही कांदिवली पूर्व येथे विनायक नावाच ट्रॅव्हल कंपनी चालवत असून ती बॉलीवूडमधील अभिनेत्री पुरवण्याचेही काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्याचं आठवड्यात गोरेगाव परिसरातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी रॅकेटमध्ये सामील असलेल्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक केली होती. सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूड कनेक्शनमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.