पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या विमाननगर येथील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. यामध्ये थायलंड देशाच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी मसाज सेंटरच्या मालकासह व्यवस्थापक महिलेला अटक करण्यात आली आहे.
मसाज सेंटरचा मालक महेश गुंडटी आणि व्यवस्थापिका प्रियांका शंकर तोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, तीन महिलांची सुटका या वेळी करण्यात आली आहे.
याबाबत सहायक पोलीस फौजदार राजू प्रभाकर बहिरट यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विमाननगर येथील फिनिक्स मॉल येथील ललवानी प्रेस्टिज येथील दुसऱ्या मजल्यावर फॉर्च्युन थाईस्पा नावाखाली मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संशयित आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी थायलंड देशाच्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असताना आढळले.