दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- राज्य शिक्षण मंडळाची दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना २५ जानेवारीपासून ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.

तेच विद्यार्थी राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन परीक्षा अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची मुदत १३ फेब्रुवारीपर्यंत आहे.

या मुदतीनंतर परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे नियमित शुल्कासह दि. 25 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरायची आहेत.

तसेच खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या आवेदनपत्रांचे नियमित शुल्क दि. 25 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरायचे आहे.

शाळा व महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यावर त्यांना कॉलेज Log In मधून Pre List उपलब्ध करून दिली असेल. त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्याने आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.

तसेच ही pre list चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट ही 22 फेब्रुवारीपर्यंत जमा करावी.

तसेच मागीलवर्षीप्रमाणेच परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करून मंडळाच्या Virtual Account मध्ये NEFT/RTGS द्वारे भरायचे आहे.

नियमित भरायच्या शुल्काच्या तारखेमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. यावेळेस कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24