सोन्याच्या दरात घसरण;जाणून घ्या दर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : मुंबईत सोन्याच्या दरात घसरण झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) शनिवारी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४६ हजार ९२९ रुपये झाला. शुक्रवारी तो ४६ हजार ९९५ रुपये होता.

चांदीचा भाव प्रती किलोला ४८ हजार ४३५ रुपये आहे. goodreturns.in या वेबसाइटनुसार शुक्रवारी दिल्लीत २४ कॅरेटचा भाव ४७ हजार ३०० रुपये होता.

चेन्नईत ४८ हजार ७९० रुपये तर मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४६ हजार ९५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४५ हजार ५०० रुपये असून चेन्नईत ४४ हजार ७२० रुपये आणि मुंबईत ४५ हजार ९५० रुपये होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24