‘त्या’ अल्पवयीन मुलीसह कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी मुंबई : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अपहरण व पाठलाग केल्याचा बनाव रचणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी ऑनड्युटी असलेल्या मोरे यांच्या सरकारी गाडीवरील चालकाला धक्काबुक्की करून त्यांना धमकावल्याचा प्रकार डिसेंबर महिन्यात घडला होता.

मोरे यांच्या चालकाने दीड महिन्यांनंतर या घटेनची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी मुलीसह तिचे आई-वडिल, भाऊ व इतर अशा एकूण ६ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

निशिकांत मोरे यांनीे २१ डिसेंबर रोजी सायंकाळी आजारी असलेल्या पत्नीला आपल्या सरकारी वाहनातून खारघर से. १३ मधील पॅसिफिक बिल्डिंगमधील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले होते. या वेळी या इमारतीखाली मोरे यांच्या वाहनावरील चालक पोलीस शिपाई राकेश गायकवाड हा मोरे यांची वाट पाहत उभा होता.

यादरम्यान, पीडित मुलीने नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून निशिकांत मोरे हे आपले अपहरण करण्याच्या उद्देशाने पाठलाग करत असल्याने आपण शौचालयात लपून बसल्याचे सांगितले होते. त्यामुळे नियंत्रण कक्षाने खारघर पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी खारघर से. १३ भागात धाव घेतली होती.

अहमदनगर लाईव्ह 24