शेतकरी हवालदिलच ! कांद्यांच्या ९३ पोत्यांना मिळाले अवघे १० हजार रुपये..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कांदा दाराची सध्या सर्वत्र घसरणच दिसून येत असून सोलापुरात देखील हीच स्थिती आहे. कांदा दर पडल्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

माढा तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याबाबत एक वृत्त आले असून त्यानं आणलेल्या कांद्याच्या ९३ पिशव्यांना केवळ १० हजार रूपयांचा भाव मिळाला आहे. या शेतकऱ्याने

कांद्याच्या लागवडीसाठी ६० हजार रूपयांपर्यंत खर्च केला होता प्रत्यक्षात त्याच्या हातात कांद्याची पट्टी १० हजार रूपये आली असल्याने तो सुन्न झाला आहे. आर्थिक संकटग्रस्त बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र आहे. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची आवक घटलेली दिसतेय.

साधारण ही १६ हजार ७०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. असे असूनही कांद्याच्या दरात वाढ होण्याऐवजी घट होतानाचे चित्र आहे. त्याअगोदर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज २५ हजार किंटलपर्यंत कांद्याची आवक होऊनही साधारण प्रतिक्विंटल दर १४०० रूपये ते २७०० रूपयांपर्यंत मिळालेला आहे.

आता कांद्याची आवक कमी झाली असे असतानाही कांदा दर वाढण्याऐवजी उलट कमी होत चालला असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी सुमारे २५ हजार किंटल कांदा दाखल झाला होता. त्यावेळी भावात घसरण होऊन कमाल दर २२०० रूपये आणि सरासरी दर ११०० रूपये भेटलेला आहे.

त्यानंतर कांदा आवक १६ हजार ७०० क्विंटलपर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळाले. तरीही भाव मात्र एक हजार ते दोन हजार रूपयांपर्यंतच मिळत होते. सरासरी दरापेक्षा कमी म्हणजे पाचशे रूपयांपर्यंत दर मिळालेल्या कांद्याचे प्रमाण जास्त आहे.

माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील कांदा उत्पादक शेतकरी पृथ्वीराज यांनी सुमारे ६० हजार रूपये लागवड खर्च करून पिकविलेला ९३ पिशव्या कांदा विक्रीसाठी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये आणला असता एका ट्रेडर्समध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळाला.

त्याच्या हातात केवळ १० हजार रूपयांची पट्टी आली असल्याची चर्चा आहे. लागवड खर्चाच्या २० टक्के खर्च निघाला नाही.