चारित्र्याच्या संशयावरून पोलिस पत्नीचा खून करून शेतकरी पतीची आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम / परभणी :- चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा वस्तऱ्याने गळा चिरून पतीने खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता.१४) खानापूर परिसरात घडली. याच घटनेत पतीने स्वतःच्या मानेवर वस्तऱ्याचे वार करून आत्महत्या केली.

कमल जाधव-माने (वय २५) असे मृत पोलिस कर्मचारी महिलेचे नाव आहे. त्या शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. तर पतीचे नाव कृष्णा धोंडीबा माने (वय २९) असून ते शेतकरी होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. 

पती-पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी शहरातील खानापूर भागात घडली. कृष्णा माने (३०), कमल जाधव-माने (२५) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

कमल जाधव-माने या नानलपेठ पोलिस ठाण्यात कर्मचारी आहेत. कृष्णा हे शेती व्यवसाय करतात. कृष्णा व कमल यांच्यात शनिवारी दुपारी वाद सुरू झाले. यामुळे भाऊ व भावजय बाहेर गेले. या वेळी कृष्णा व कमल यांच्यातील वाद वाढला.

याच वेळी कृष्णा याने पत्नी कमल हिच्या मानेवर, गळ्यावर व अंगावर धारदार शस्त्राने वार केले. गळ्यावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने कमल यांचा आतील खोलीत मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यूू झाल्याचे दिसताच कृष्णा याने स्वत:च्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24