आमदार नसताना शेतकरी आपले प्रश्‍न घेऊन येतात : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी १0 वर्षे आमदारकीचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा विकास कामातून विश्वास निर्माण केला. त्यामुळे आजही मतदारसंघातील नागरिक विविध प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असतात.

माझ्या विरोधात निवडून आलेले उमेदवाराला राज्य ऊर्चामंत्री पद मिळाले असले तरी शेतकरी विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे येत आहे. मंत्री पद हे फक्त नावालाच घेतले आहे. मी आमदार नसलो तरी शेतकऱ्याचे प्रश्न मी सोडवत असल्यामुळे शेतकरी तसेच सर्व सामन्य नागरिक माझ्याकडे येत आहे.

संकटाच्या काळामध्ये मी नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलो आहे. दुष्काळामध्ये मोठ्याप्रमाणात चारा छावण्या सुरु करुन दिल्या. आताही संकटाच्या काळामध्ये जिल्हा बॅकेच्या माध्यमातून कर्जरुपी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देत आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्‍यातील कापूरवाडी, बारा बाभळी, सोनेवाडी व मेहेकरी येथील शेतकऱ्यांना जिल्हा बॅकेच्या माध्यमातून खेळते भांडवलाचे चेक वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, रघुनाथ लोंढे, अभिलाष धिगे, संतोष म्हस्के, मनोज कोतकर, रावसाहेब साठे, बाबासाहेब जाधव,

दिपक लांडगे, सुरेश सुंबे, शरद दळवी, दिलीप भालसिंग, प्रंशात गहिले, विलास शिंदे, कानिफनाथ कासार, राजू भिंगारदिवे, रंगनाथ कर्डिले, दत्ता तापकिरे, रवी कर्डिले, मच्छिंद्र दुसुंगे, जगन्नाथ कराळे, शंकर पवार, मिनीनाथ दुसुंगे, संभाजी भगत, मारुती कचरे, बापूसाहेब शिंदे, बाबासाहेब खर्से, अंबादास बेरड,

गुलाबराव लांडगे, पाहुल पानसरे, राम पानमळकर, संजय धोतरे, संतोष पालवे, विजय खोमणे, माणिक वाघस्कर, मज्जूभाऊ शेख, अय्युब पठाण, अजय गारदे, किरण दळवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुरेश सुंबे म्हणाले की, संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना योग्यवेळी बॅकेच्या माध्यमातून मदत घेऊन येण्याचे काम माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

अतिवृष्टीमुळे शेतकरी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने शेतकरी अडचणीत सापडला. अशा वेळेस आर्थिक मदतीचा गरज शेतकऱ्यांना होती. ती गरज माजी मंत्री कर्डिले यांनी पूर्ण केली. सुमारे ९ कोट रुपयांची अर्थसहाय्य देण्याचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधन व्यक्त केले. असे सुंबे म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24