शेतकरी पुन्हा संकटात … कांद्याचे दर घसरले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राहुरी बाजार समितीत एक नंबर कांद्याला ५०० ते ६५० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला.

शुक्रवारच्या तुलनेत मंगळवारी दुपारी झालेल्या लिलावात कांदा बाजारभाव क्विंटल मागे ७५ रुपयांनी घसरले.

दोन नंबर कांद्याला २९० ते ४९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १०० ते २८५ रुपये,

तर गोल्टी कांद्याला २०० ते ४०० रुपये क्विंटलचा मातीमोल बाजारभाव मिळाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे लाॅकडाऊनच्या काळात

गेल्या ५५ दिवसांपासून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावरील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शुक्रवारपासून लिलाव सुरू झाले.

या लिलावात कांदा आणण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक करण्यात आले.

तसेच लिलावाच्या दिवशी १०० शेतकऱ्यांना ५ हजार क्विंटल कांदा घेऊन येण्याची मर्यादा होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24