महाराष्ट्र

BIG News | राज्यातील शेतकरी पुन्हा संपावर जाणार?

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news : राज्यात प्रथमच शेतकऱ्यांचा संप घडवून आणलेल्या नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकरी पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत.

पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांची आणि विविध संघटनांची एक बैठक झाली. त्यामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.सोमवारी २३ मे रोजी पुणतांबा गावात विशेष ग्रामसभा होणार आहे.

या सभेत शेतकरी आंदोलनाबाबत पुढची दिशा ठरणार आहे. शेतकऱ्यांनी २०१७ मध्ये ऐतिहासिक संप पुकारला होता. १६ दिवस हा संप सुरू होता. त्याचे केंद्र पुणतांबा होते. आता पुन्हा तेथेच शेतकरी एकवटले आहेत.

राज्यात ऊस, कांदा आणि विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर किसान क्रांतीचे पदाधिकारी, शेतकरी नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी यांची बैठक पार पडली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office