अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-शहर असो वा गाव सर्वत्र अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनधिकृतपणे जागेवर कबजा करीत हे अतिक्रमण वाढवले जात असल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे.
दरम्यान पुणतांब्यात चक्क शेतकऱ्यांकडून केले गेलेल्या अतिक्रमणामुळे चक्क रस्ताच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणतांबा-जळगाव या अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर शेतकर्यांनी अतिक्रमण केले आहे. शेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्याची स्थापना झाल्यानंतर कारखान्यांना ऊस पाठविण्यासाठी या रस्त्याचा प्रामुख्याने वापर केला जात होता.
मात्र गेल्या काही वर्षांपासून रस्त्यालगत शेती असणार्या काही शेतकर्यांनीच रस्त्यावर अतिक्रमणाचा धडाका लावला आहे. हि बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतर येथील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा केला होता. मात्र सध्या पुन्हा अतिक्रमणे वाढली आहेत.
मध्यंतरी ही अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र शेतात पिके असल्यामुळे व काही शेतकर्यांनी विरोध केल्यामुळे काम थांबविण्यात आले होते. अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेताना मोजणी करून खुणा करताना नेहमी बदल होतो.
त्यामुळे मूळच्या नकाशाप्रमाणे रस्त्यावरील खुणा कराव्यात. तसेच दोन्ही टोकापासून खुणा करून सरसकट अतिक्रमणे काढण्याची शेतकरी वर्गाची मागणी आहे.
तसेच तहसीलदार यांनी लक्ष घालून रस्त्याची मूळ नकाशाप्रमाणे दोन्ही टोकापासून मोजणी करून खुणा निश्चीत कराव्यात व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढावीत. अशी मागणी काही शेतकरी करू लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved