शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार नुकसान भरपाई द्यावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  नगर दक्षिण मध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 30 हजार नुकसान भरपाई मिळावी तसेच दक्षिण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे, जिल्हध्यक्ष अरुण मुंडे, संघटन सचिव प्रसाद ढोकरीकर, सरचिटणीस दिलीप भालसिंग, उपाध्यक्ष शाम पिंपळे, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे आदि उपस्थित होते.

या निवेदनात म्हंटले आहे कि, संपुर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्याच्या पिकांचे प्रंचड नुकसान झालेले आहे. कोरोनाच्या परिस्थितीने शेतकरी त्रासला गेला आहे.

अशा प्रसंगी शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीमुळे हिराउन घेतलेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

त्यामुळे सरकारी यंत्रणांना तात्काळ शेतमालाच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश देउन त्वरीत शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच अहमदनगर (दक्षिण) मध्ये जिल्ह्यांतर्गत जाणा-या सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.

अहमदनगर- सोलापूर, अहमदनगर-राहुरी नगर- शेवगाव, नगर- पाथर्डी, नगर-श्रीगोंदा , नगर-पारनेर इ. रोड वरील खड्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सध्या वाहनचालक जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करत आहेत. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ उपाययोजना राबवाव्यात यासाठी भाजपच्या वतीने निवदेन देण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24