शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – आमदार पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे :- कुकडीच्या पाण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा चालू आहे, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. पत्रकात म्हटले आहे, अडचणी बऱ्याच आहेत.

आपल्या भागात कुकडीचे पाणी आठ दिवस उशिरा मिळाले. कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी अधिकारी, कर्मचारी नसल्याने खालील भागात पाण्याचा वापर थोडा जास्त झाला.

सद्यस्थितीत सर्वांना पाणी कसे देता यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण भरणे करण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

परिस्थिती अतिशय गंभीर असून सर्वांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गोरगरिबांना भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठलीही प्रसिद्धी न करता धान्य वाटप केले जात आहे.

शेजारील जामखेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. श्रीगोंदे-नगर मतदारसंघातील अनेक नागरिकांचा शेजारील जामखेड व नगरशी संपर्क होत असतो. त्यामुळे आपण थोडी खबरदारी घेतली पाहिजे, असे पाचपुते यांनी नमूद केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24