महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नंतर शेतकरी मेटाकुटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-हा’महाराष्ट्र तोच आहे. या महाराष्ट्रात २०१९ पूर्वी कधीही लाईट जात नव्हती, डीपी जळल्याच्या तक्रारी होत नव्हत्या, ऑइल संपत नव्हते आणि संपले तरी तात्काळ देत होतो.

पण त्याच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नंतर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अडचणीत आला आहे, त्याला लाईट वेळेवर मिळत नाही, मिळाली तर पूर्ण दाबाने मिळत नाही.

त्यावर कळस म्हणून वीज बिल भरावे यासाठी तगादा लावला जातोय,’ असा आरोपही माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आता कोरोनाची लस आता येत आहे.

केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोफत करोना लस देणार असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रातील जनतेला देखील कोरोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24