मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महा विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर अनेक बैठकानंतर निश्चित झाला. या बैठकी कडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. तीन वेगवेगळ्या विचारसरण्याचे पक्ष एकत्र आल्याने नेमके मुद्दे घेतील याची सर्वाना उच्छूकता होती.
शपथविधीच्या अगोदर तो जाहीर करण्यात आला. एकूण २८ मुद्दे असलेल्या या किमान समान कार्यक्रमात शिवसेनेच्या वचननाम्यातील १३, आघाडीच्या शपथनाम्यातील १० आणि २ समान मुद्द्यांसोबतच ३ नवीन मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पाहुयात यातील काही मुद्दे
शेतकरी
अवकाळी पावसामुळे व पुरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार
नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा यासाठी पिक विमा योजनेची पुनर्रचना करणार.
शेतमालास योग्य भाव मिळवण्यासाठी उपाययोजना करणार.
बेरोजगारी
शासकीय सेवेतील रिक्त पदे त्वरित भरणार.
सुशिक्षित बेरोजगार युवकांना फेलोशिप उपलब्ध करून देणार.
नोकऱ्यांमध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना संधी मिळावी यासाठी कायदा करणार.
शिक्षण
शिक्षणाचा दर्जा उंचावणार आर्थिक दुर्बल घटक व शेतमजुरांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी योजना राबवणार.
राज्यात सर्वसामान्यांसाठी स्वस्त व सकस जेवणाची थाळी १० रुपयांत देण्याची व्यवस्था
आरोग्य
सर्व आरोग्य चाचण्यांची सुविधा देण्यासाठी तालुका पातळीवर एक रुपया क्लिनिक योजना सुरू करणार.
सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालये