शेतकऱ्यांची अडवणूक सहन करणार नाही – खासदार सदाशिव लोखंडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : शेतकऱ्यांंची पिक कर्जासाठी अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना बांधावर खते, बी-बियाणे देण्यात यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक सहन करणार नाही,

अशी तंबी खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांना दिली.

अकोले येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे होते. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी बाळासाहेब कोटकर,

अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले, नगरपंचायतचे नगरसेवक प्रमोद मंडलिक, म्हाळादेवीचे सरपंच प्रदीप हासे, प्रभाकर फापाळे, महेश देशमुख, सहकारी विभागाचे सहाय्यक निबंधक व सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे शाखाधिकारी उपस्थित होते.

खासदार लोखंडे म्हणाले, शेतकरी थकबाकीदार असला तरी त्याला पिक कर्ज देण्यापासून बँकांनी वंचित ठेवू नये. शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ततेसाठी बँकांनी प्रत्येक शेतकर्‍याला पिक कर्ज दिलेच पाहिजे. अन्यथा त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24