महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ ! महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- महाराष्ट्रात सध्या गहू – हरभऱ्या सह अनेक पिके काढणी च्या अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यात हवामान वेधशाळेकडून राज्यात अवकाळी पावसा सह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे.

पीक काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.तर त्याच बरोबर हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अवकाळी पावसासह विशेष म्हणजे. मध्य भारतात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान याठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पावसा दरम्यान वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे. ताशी 40 कि.मी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले पिक जाईल म्हणून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना काळात अतिवृष्टी झाली होती त्यातून शेतकरी कुठे सावरतोय तोच सध्याच्या बदलत्या हवामानाने त्यांच्या चिंतेत वाढ केली आहे.

Ahmednagarlive24 Office