परजातीच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने बापाने केली मुलीची हत्या आणि नंतर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
डोंबिवली : परजातीच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने बापाने मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना रविवारी टिटवाळा येथे घडली होती.
धड व शीर नसलेला मृतदेह कल्याण स्टेशन परिसरात बॅगेत सापडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी बापाला पोलिसांनी अवघ्या ३० तासांत अटक केली.
त्या वेळी त्याने आपल्या मुलीच्या शरीराचे तीन तुकडे करून शीर व धड दुर्गाडी ब्रिजवरून खाडीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आतापर्यंत धड शोधण्यात आले आहे. मात्र, शीर अजूनही सापडले नाही.
गेल्या रविवारी सकाळी कल्याण स्टेशन बाहेर आलेल्या एका इसमाच्या हातात भली मोठी बॅग होती. या बॅगमधून वास आल्याने रिक्षावाल्याने त्याला हटकले असता तो इसम बॅग खाली ठेवून स्टेशनच्या दिशेने पळून गेला होता.
त्यानंतर रिक्षावाल्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगमध्ये एक २० ते २५ वर्ष वयोगटातील स्त्री जातीचा अर्धा म्हणजेच कमरेपासून खालचा भाग आढळून आला होता.
गौरवर्णीय त्या महिलेच्या पायामध्ये पिवळी लेगिंग घातलेली होती. शीर व धड नसलेला अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा आरोपी रेल्वे स्टेशनमधून बाहेर आला होता व पुन्हा स्टेशनमध्ये गेला होता.
त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी टिटवाळ्यातून ट्रेनमध्ये चढल्याचे निष्पन्न झाले होते.पोलिसांनी टिटवाळा गाठत रिक्षाचालकांकडे चौकशी केली असता आरोपी नांदप रोडवरील इंदिरानगर भागात रिक्षामध्ये बसल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो दाखवून पोलिसांनी शोध सुरू केला असता एका शाळकरी मुलीने आरोपी हा आपल्या साईकृपा चाळीत मुलीसोबत राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अरविंद रमेशचंद्र तिवारी (४५) याला अटक केली.
अहमदनगर लाईव्ह 24