जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत करायचा अत्याचार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

चिखली :- जन्मदाता बापच १५ वर्षांच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देत तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे प्रकरण देऊळगाव घुबे गावात उघडकीस आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईकांच्या मदतीने मुलीने पोलिसांत तक्रार दिली. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

धक्कादायक बाब म्हणजे मुलीने नातेवाईकांना याची माहिती दिल्यानंतर बापाला समजावण्याचा प्रयत्न झाला.

मात्र बापाने अत्याचार सुरूच ठेवल्याने पीडित मुलगी रस्त्यावर रडत बसल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24