भय इथले संपत नाही..! स्त्रियांकडे पाहून अश्लील कमेंट, गाणे म्हणण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, पहा धक्कादायक आकडेवारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : महिलांवरील अत्याचार, विनयभंग आदी घटना कमी होण्याचे नाव घेत नाही. महिलांच्या बाबतीत त्यांची सुरक्षा ही महत्वाची असते. परंतु अलीकडील काळात त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना जास्त आहेतच परंतु रस्त्याने जाताना किंवा इतर ठिकाणी महिलांकडे पाहून अश्लील कमेंट करणे, गाणे म्हणणे आदी गोष्टी देखील वाढल्या आहेत. त्यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे मुश्किल होऊन बसते.

आता एका आकडेवारीनुसार स्त्रियांकडे पाहून अश्लील कमेंट, गाणे म्हणण्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. हे आपल्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे.

मध्य प्रदेश याबतीत प्रथम क्रमांकावर आहे. अश्लील कृत्ये, गलिच्छ कमेंट्स व सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी म्हणणे आदींबाबत सर्वाधिक गुन्हे मध्यप्रदेशात दाखल आहेत. एनसीआरबी डेटाच्या आधारे केंद्र सरकारने दिलेल्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात ४२२२ घटना समोर आल्या आहेत. संपूर्ण देशभरात अशी २५,७४१ प्रकरणे नोंदवली असून सर्वाधिक १०,१३३ प्रकरणे मध्य प्रदेशात घडलेली असल्याचे दिसते.

का दिला अहवाल?

हा अहवाल तयार करण्यामागे नैतिक मूल्यांशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रकरणांचे मूल्यांकन करणे व त्यात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित राज्यांना देणे हा उद्देश आहे. त्यासाठी अहवाल तयार करून राज्यांना देण्यात आला.

यामध्ये देशातील १९ मोठ्या शहरांमध्ये असे गुन्हे सर्वाधिक घडल्याचे दिसते तर यात नागपूर प्रथम तर इंदूर सहाव्या क्रमांकावर असल्याचे दिसते.

 एक नजर आकडेवारीवर

मध्य प्रदेशमध्ये 10,133, तामिळनाडूमध्ये 5,356, महाराष्ट्रमध्ये 4,222, उत्तर प्रदेशमध्ये 2,874, केरळमध्ये 955, आंध्रप्रदेशमध्ये 657, छत्तीसगडमध्ये 579, आसाममध्ये 343, हरियाणामध्ये 234, तेलंगणमध्ये 187, ओडिशामध्ये 75 , गुजरातमध्ये 54