अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. यातच बिबट्याच्या हल्ल्यानं अनेक जण जखमी झाले आहे तर काही जणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.
यातच श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याकडून शेळ्यांचा फडशा पाडण्याचे काम सुरु आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव शिवारात देवमळा परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर बिबट्यांनी बुधवारी रात्री हल्ला केला.
बिबट्यांच्या या हल्ल्यात आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून मढेवडगाव शिवारात बिबट्यांनी बस्तान बसविले असुन सुरुवातीला कुत्री गायब केली.
आता शेतकऱ्यांच्या शेळ्यांकडे मोर्चा वळविला आहे. बिबट्या हा शेतकऱ्यांचा मित्र आहे भविष्यात त्याला बरोबर घेऊन राहावे लागणार जगावे लागणार आहे.
शेतातील पिकांची रानडुकरे नासाडी करतात रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या पुरेसा आहे. बिबट्या घातक असला तरी शेतकऱ्यांचा मित्र आहे.
फक्त लहान मुलांवर लक्ष ठेवा व शेळ्या मेंढ्या वासरे यांना रात्रीच्या वेळी बंदिस्त गोठ्यात बांधावीत आणि रात्रीच्या वेळी एक काठी व बॅटरी बरोबर घेऊन शेतात जावे.असे प्रतिपादन पुण्याचे सहायक वनसंरक्षक कल्याण साबळे यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved