कंगनावर गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  मुंबई आणि महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत विरोधात सर्वत्र निदर्शने केली जात आहे.

कंगनावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत यांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तिच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाथर्डी शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे व तालुका उपसंघटक आसाराम ससे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करणाऱ्या

अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक रत्नपारखी यांच्याकडे केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24