गुटखा प्रकरणातील पोलीस निरीक्षकाची तक्रार करणाऱ्या तक्रादारावर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास अरेरावी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वळण (ता. राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी संदीप कमलाकर रविवारी (ता. 18) रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांना समन्स बजाविण्यासाठी वळण येथील त्यांच्या घरी गेलो होतो.

त्यावेळी मकासरे यांनी समन्स घेण्यास नकार देत पोलीस कर्मचारी कमलाकर यांना शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला.

श्रीरामपूर तालुक्‍यातील एकलहरे शिवारात पकडलेल्या 54 लाख रुपयांच्या गुटखाप्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे पाठीशी घालत असल्याचा आरोप करणारी तक्रार मकासरे यांनी वरिष्ठांकडे केला होता.

या चौकशीचे आदेशही देण्यात आले. दरम्यान, बहुचर्चित गुटखा प्रकरणाचा बहिरट यांच्याकडील तपास काढून घेण्यात आला.

विशेष म्हणजे, श्रीरामपूरचे पोलिस अधीक्षक राहुल मदने यांना डावलून हा तपास शिर्डीच्या पोलिस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मदने यांच्याच अधिपत्याखालील राहुरी पोलिस ठाण्यात मकासरे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या या गुन्ह्याची पोलिस वर्तुळात राज्यभर चर्चा सुरू आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24