महसूलमंत्र्यांवर टिप्पणी करणारी पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश हौशिराम भोर (रा. चैतन्यनगर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अविनाश भोर याने त्याच्या फेसबुक खात्यावर महसूलमंत्री थाेरात यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

ही पोस्ट थोरात यांचा अवमान करणारी असून त्यांच्या विरुद्ध व पूर्वग्रहदूषित होऊन भोर याने पोस्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या बदनामीकारक पोस्टमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भोर विरोधात कठोर कारवाई करावी.

अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान अविनाश भोर याच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते सिद्धेश विनोद घाडगे (रा. खंडोबा गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉस्टेबल गोरे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24