अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कल्याण रोड रेल्वेपूल ते सक्कर चौकापर्यंतचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून शहरातून जाणारा हा रस्ता आहे.
या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. ४८ तासात रस्त्यावरील खड्डे बुजवावे,
अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने रास्ता रोको करण्याचा इशारा उपअभियंता दिलीप तारडे व शाखा अभियंता आदिनाथ चौधरी यांना विभागप्रमुख अनिकेत शियाळ यांनी दिले.
जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष परेश पुरोहित, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, रोहित कोतकर, यश भांबरकर, अजर शेख उपस्थित होते.उपअभियंता दिलीप तारडे म्हणाले :
“हा रस्ता केंद्राच्या अधिकारात आहे. २०१८ साली कल्याण रोड उड्डाण पूल ते सक्कार चौकापर्यंतचा रस्ता चौपदरीकरण, दोन्ही बाजूने गटार, फुटपाथ, डिव्हाईडर व स्ट्रीट लाईट व सीना नदीवरील पुलाच्या बांधकामाचा २८ कोटींचा प्रस्ताव
केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. दरम्यान नगर मधील खड्डे आणि त्यांचे सुरु असलेले राजकारण पाहता आता अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved