मोठी बातमी : अखेर ‘त्यांच्या’वर गुन्हा दाखल…कर्तव्याची जबाबदारी पोलिसांनी पार पाडल्याने मान नगरकरांसमोर उंच !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लघंन करुन रात्री दौड रोडवरील हाँटेल फुटलाँन्ड पार्कमध्ये सुरु असणाऱ्या हुक्का पाँटवर नगर तालुका पोलीसांनी छापा टाकला . यावेळी हाँटेल मालकासह दोन महिलांसमवेत नगर शहरातील २० जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या छाप्या दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेक राजकीय पुढाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता .परंतु कोणालाही न जुमनता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कर्तव्याची जबाबदारी पोलिसांनी पार पाडल्याने पुन्हा पोलिसांची मान नगरकरांसमोर उंच झाली आहे, याच पद्धतीने कारवाया सुरू राहिल्यास पोलिसांची गुन्हेगारीसह अवैध धंद्यावर वचक निर्माण होऊ शकतो, असे अनेक सामाजिक संघटनांनी म्हटले आहे.

हाँटेल मालक सतिष किसनराव लोटके, अरुण बाबासाहेब ढमढेरे (रा.अरणगाव ता.जि.अहमदनगर) आणि नगर शहरातील श्रेयश संजय कोठारी (वय २८, रा.बुरुडगाव रोड, नक्षत्रलाँनमागे, अ.नगर), रमेश प्रसाद शहा ( रा.कापडबाजार, चाँद सुलताना शाळेजवळ,अ.नगर), अभिषेक अदाके संचेती (वय ३०, बुरुडगाव रोड नक्षत्रलाँनमागे, अ.नगर), अदित्य सतीष ईदानी (वय३०,रा.महेश टाँकीजमागे,काराचीवाला,अ.नगर),

मोहित कष्णाकांत शहा (वय २६, रा.खिस्तगल्ली, अ.नगर), अंकित महेश लुणिया (वय ३०, रा.माळीवाडा, वसंतटाकीजवळ, अ.नगर), अंकीत अमतलाल कोठारी (वय २८, रा.वसंत टाँकीजजवळ, माळीवाडा अ.नगर), घनशाम बारकू ठोकळ (वय ४०,रा.समर्थनगर, बोरुडगाव, अ.नगर), किरण छगनराव निकम (वय ३९, रा.नक्षत्रलाँनजवळ,बुरुडगावरोड, अ.नगर), गणेश संजय डहाळे (वय २४, रा.तोफखाना श्री मेडिकलजवळ,अ.नगर),

रोहित नितीन शहा (वय २३, रा.खिस्तगल्ली,अ.नगर), दिपक जितेंद्र गिडावानी (वय २३, रा.शिलाविहार पाईपलाईन रोड, अ.नगर), यश कन्हयालाला लुभिया (वय २३, रा.मिस्कीननगर, सावेडी, अ.नगर), अदित्य गोरख घालमे (वय २५, रा.गुजरगल्ली,अ.नगर), करण विजय गुप्ता (वय २४, रा.गंजबाजार,अ.नगर), किसन चंद्रकुमार माखिजा (वय २५, रा.प्रोफेसर काँलनी, सावेडी, अ.नगर) आदिसह दोन महिलांचा नावाचा समावेश नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी (दि.२०) रात्री नगर तालुका पोलीस पेट्रोलींग करीत असताना, त्यांना नियंत्रण कक्षेतून एका इसमास दौंडरोड येथे मारहाण झाली आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार काँलर चर्चा करून माहिती घेऊन त्या इसमास पोलीस ठाणे येथे जाण्याची समज दिली.त्यानंतर हाँटेल फुटलाँन्ड पार्क समोर वाहनांची गर्दी दिसल्याने सपोनि राजपूत व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहाणी केली.

यावेळी हाँटेलमध्ये मालक ढमढेरे हे होते. त्यांना हाँटेल सुरू असण्याबाबत विचारणा केली, त्यांनी उत्तर दिले नाही. पोहेकाँ अनथा गायकवाड ही बाब सपोनि राजपूत यांना सांगितली. यानंतर सपोनि राजपूत यांनी दोन पंचाना बोलावून त्याच्या समक्ष परिस्थितीचा पंचनाम्यासाठी हाँटेल मध्ये जाऊन पाहिले.

त्या ठिकाणी हाँटेल मध्ये ग्राहक म्हणून बसलेल्या अनेक ईसम चालू जळत्या हुक्का पाँट मधून हुक्का ओढत असल्याने व दारु पित असल्याचे दिसून आले. हाँटेल मालक त्यांना खाद्यपदार्थ विकाताना मिळून आला. या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता, हाँटेल मालक याने हुक्का पाँट व त्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू मिळून आली.

तसेच या ठिकाणी नगर शहरातील वरील नावांची दोन महिलांसह १८ जण मिळून आली.ही विशेष कारवाई नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजपूत, पोहेकाँ गायकवाड, पोना खेडकर, मरकड, राहुल शिंदे, पोना कुसळकर आदिंनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24