अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक, नियोजन तसेच आराखडा तयार करण्यासंदर्भात विद्यापिठांना सांगण्यात आले आहे.
*ओणालीअं ऑफलाईन पर्याय खुला* :- विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून ऑनलाईन पध्दतीने देता येणार
असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन परीक्षा देता येणार नाहीत,
त्यांच्यासाठी ऑफलाईन पध्दतीचा पर्यायही खुला ठेवला जाणार आहे. पुढील आठवड्यात परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा सुरू होण्यापुर्वी बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.
प्रत्येक विषयाची परीक्षा बहुपर्यायी ५० गुणांची होणार असून त्यासाठी एक तासांचा वेळ दिला जाणार आहे. बॅकलॉग असलेल्या
विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १० ते २२ ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे.
तसेच १५ ऑक्टोबररपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved