Eknath Lomte Maharaj Arrested : अखेर स्वयंघोषित महाराज लोमटेला पंढरपुरातून अटक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eknath Lomte Maharaj Arrested : मलकापूर येथील स्वयंघोषित महाराज व कथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला विनयभंग व मारहाणप्रकरणात पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे. जुलै २०२२ मध्ये दाखल या गुन्ह्यात एकनाथ लोमटे महाराज पोलिसांना गुंगारा देत होता.

परंतु, पोलिसांनी अखेर पंढरपूर येथून महाराजाला अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता दि. १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कळंब तालुक्यातील मलकापूर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत तेथील स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे याने तिचा विनयभंग करत तिला मारहाण केल्याची घटना २८ जुलै २०२२ रोजी घडली होती.

याप्रकरणात तक्रार दाखल होऊ नये म्हणून पीडित महिलेला धमकावले होते. लोमटे महाराजाने तेथून पळ काढला होता. तेव्हा याप्रकरणात येरमाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हा अटक केल्यानंतर महिनाभरात लोमटे महाराज जामीनवर बाहेर सुटला.

तेव्हापासून महाराज पोलिसांना हुलकावणी देत होता. महाराज पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळताच येरमाळा येथील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे यांच्या पथकाने थेट पंढरपूर गाठत एकनाथ लोमटे महाराजाला अटक केली.

महाराजाला कळंब न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तपास कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश साबळे हे करत आहेत.