अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा आज अखेर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली.
यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेलेले कर्ज या कर्जमाफी अंतर्गत माफ करण्यात येणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजना असे या कर्जमाफी योजनेचे नाव असेल.