अखेर ‘या’ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार! ई-निविदा निघाल्याने आ.रोहित पवारांनी मानले ना. गडकरींचे आभार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ (अ) या चौपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत.

नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी क्र.५१६(अ) महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ कि.मी. कामासाठी ५४७.१६ कोटी एवढा निधी तर घोगरगाव ते नगर-सोलापुर हद्द या ४१.६१५ किमी कामासाठी ६४१.४५ कोटी एवढा निधी दोन पॅकेजमध्ये राज्य शासनाच्या भारतमाला परीयोजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे.

अनेक अडचणींमुळे गेली तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबतची सर्व कार्यवाही थांबली होती. महामार्गासाठी भुसंपादनाचा प्रश्न तसेच काही गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या नलिका व इतर अडचणींमुळे या कामास अडथळा निर्माण झाला होता.

मात्र आ.रोहित पवारांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सर्व अडचणी समजावून घेतल्या आणि मगयोग्य नियोजन अन् उपाययोजना करत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या-त्या विभागास आपापली जबाबदारी देऊन कार्यवाहीच्या सुचना दिल्या.

एका महिन्याच्या कालावधीनंतर आ.पवारांनी दुसरीही बैठक त्याच ठिकाणी घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी आ.रोहित पवारांचा पॅटर्न राबवुन सर्व अडचणी मार्गी लावण्यात अधिकाऱ्यांनाही यश आले.

अहमदनगर लाईव्ह 24