अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नगरच्या अधीक्षकपदी बदली झाली असून येत्या सोमवारी सूत्रे स्वीकारणार आहेत.
दरम्यान, विद्यमान पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या बदलीचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. अधीक्षक पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कौलगे येथील रहिवासी आहेत.
संगणकशास्त्रात अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांची १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली. कोल्हापूर, सातारा, ठाणे, पुणे व सोलापूर येथे उपअधीक्षक व अतिरिक्त अधीक्षक या पदांवर त्यांनी काम केले.
२०१० मध्ये ते आयपीएस झाले. त्यांनी दौंड येथे राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक म्हणून व ठाणे शहरात उपायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची सोलापूर (ग्रामीण) येथे पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved