ऑनलाइन जोडीदार शोधण महिलेला पडले महागात झाले असे काही कि…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जीवनसाथी या वेबसाइटवर जोडीदार शोधणाऱ्या पुण्यातील एका महिलेस ९ लाखांना घातला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार समीर जोशी उर्फ जगन्नाथ पाटकुले (रा.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला एका बड्या कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी जीवनसाथी डॉट कॉमवर विवाहासाठी नोंदणी केली होती. त्यांच्या मोबाइलवर आरोपीने समीर जोशी नावाने संपर्क साधला.

स्वत: मलेशियातील एका बड्या कंपनीत कामाला असल्याचे सांगितले.यानंतर भारतात आल्याचे सांगत प्रत्यक्षात फिर्यादीची भेट घेतली.फिर्यादीशी सातत्याने भेट घेत त्यांचा विश्वास संपादन करत

यानंतर संगणक व इतर साहित्य घेण्यासाठी फिर्यादीकडून थोडे थोडे रोख व धनादेश स्वरुपात तब्बल ९ लाखांची रक्कम घेतली. त्यांच्या भेटीचा आणि पैशाचा व्यवहार फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होता.

नऊ लाखाची रक्कम घेतल्यावर आरोपी समीरने फिर्यादीशी संपर्क बंद केला. फिर्यादी महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24