भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर  – शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर यांच्यासह चार जणविरोधात  अनुसूचित जाती जमाती अधिनियम व अत्याचार करणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून काल शनिवारी (१७) रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर, गणेश फुलसौदर, महेश फुलसौदर, अरुण फुलसौदर (सर्व रा बुरुडेमळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहे

याबाबत थोडक्यात माहिती की, सोमवारी (दि.१२) सायंकाळी ४.३० वाजता बुरुडगाव येथील पडीक रान परिसरात पीडित महिला ही या बकऱ्या चरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी यांनी  संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तेथे आले.  

तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबत असलेला जागेचा वाद मिटवायाचा आहे की नाही ?  असे म्हणून आरोपी  यांनी पीडीतेला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.  डोक्यावर मारहाण केल्यामुळे पिडीत महिला बेशुद्ध पडली.  

आरोपी  (२) गणेश फुलसौदर व (३) महेश फुलसौदर यांनी सदर महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला व इतरांनी घेराव घातला. तू जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली तर तु व तुझे संपुर्णला कुटुंबाला जीवे मारू असे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24