अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाचा अकोले तालुक्यालाही चांगलाच फटका बसला. जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील घाटघरला चोवीस तासात साडेपाच इंच पाऊस कोसळला आहे.
याच तालुक्यात सर्वाधिक नुकसानही झाले आहे. बुधवारी घाटघर येथे १३१ मि.मी तर रतनवाडी येथे १०८ मि.मी पाऊस पडला. सुगाव येथे रस्त्यावर झाड पडल्याने अकोले-संगमनेर रोडवरील वाहतूक काही काळ बंद झाली होती.
तालुक्यातील अनेक गावात झाडे कोसळुन घरासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने भंडारदरा धरणात २४ तासात ४८दशलक्ष घनफूट नवे पाणी आले आहे. निळवंडे धरणात ५२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews