अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील चिचोंडीमधील बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह असणार्या भागातील ४८४ लहान कोंबड्या, १५४ मोठ्या कोंबड्या, ४५१ अंडी आणि १५० खाद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
दरम्यान नुकतेच राहुरी तालुक्यातील सडे गावात शनिवारी पाच कोंबड्या मृत पावल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने या मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन तातडीने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
याबाबतची माहिती डॉ. तुंबारे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१ ठिकाणी विविध पक्षी मृत आढळून आले. यात कोंंबड्या, कावळे, साळुंकी, कबुतर, होला, बुलबुल या पक्षांच्या समावेश आहे.
या २१ ठिकाणांपैकी ४ ठिकाणचे अहवाल प्राप्त झाले असून यात श्रीगोंदा तालुक्यातील भानगावचा कावळा आाणि चिचोंडी पाटीलच्या कोंबड्या बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत.
उर्वरित दोन अहवाल निगेटिव्ह असून अद्याप १७ अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.